पुणे

समर्थकांसह इच्छुकांची धावपळ

CD

मोशी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालय परिसरात मोठी गर्दी व राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. सर्वच उमेदवार, समर्थक व त्यांच्या कार्यकर्त्यांची ‘क’ प्रभाग कार्यालय परिसरात धावपळ सुरू होती. सकाळी ११ वाजेपासूनच विविध पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसह कार्यालयात दाखल होऊ लागले.

‘क’ प्रभाग कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरच बॅरिकेड्स लावले होते. प्रमुख उमेदवार आणि दोन-चार कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही कार्यालयात जाण्यापासून पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता. उमेदवारांच्या गळ्यातील पक्षाचा पंचा, छातीला लावलेला बिल्ला यामुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. काही उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणत शक्तिप्रदर्शन केले. यामुळे कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ गर्दीचा ताणही जाणवत होता.
प्रभाग क्रमांक दोन व सहामधील भाजपच्या काही उमेदवारांना सोमवारीच ए-बी फॉर्म मिळाल्याने या प्रमुख उमेदवारांनी सोमवारीच अर्ज दाखल केले होते. तरीही, ते आज पुन्हा एकदा कार्यालयात हजेरी लावून राजकीय वातावरणाचा अंदाज घेत होते. कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेणार नसल्याने काही अपक्ष उमेदवारांनी सत्रातच अर्ज दाखल करून आघाडी घेतली. प्रभाग आठ व नऊमधील उमेदवार दुपारच्या सत्रात कार्यालयात दाखल झाले होते. शेवटच्या अर्धा तासात वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
ए-बी फॉर्म, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र किंवा सही यातील त्रुटींमुळे काही अर्ज पुन्हा तपासण्यासाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी गडबडीत दिसले. पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्यांचीच तिकिटे कापल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. अनेक उमेदवारांचे अर्ज वेळेत स्वीकारले जावेत यासाठी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही दृश्य पाहायला मिळाले. अर्जातील एखादी चूक दुरुस्त करण्यासाठी धावपळ, छायांकित प्रती काढणे, तर काही ठिकाणी शेवटच्या क्षणी ए-बी फॉर्म आणण्याची घाई यामुळे शेवटचा अर्धा तास विशेष गजबजलेला ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT