पुणे

फराटे पाटील कॉलेजमधील १० विद्यार्थ्यांची निवड

CD

मांडवगण फराटा, ता. १८ : येथील श्री वाघेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान संचालित श्री दादा पाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसी व फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा कॉलेज येथे वॉक इन इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
महाविद्यालयातील सभागृहात सकाळी दहापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते.‌ यामध्ये बी फार्मसीच्या अंतिम वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडाप्टीस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने रेग्युलेट्री अफेयर्स डिपार्टमेंट मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या कंपनीचे संस्थापक डॉ. दिलीप शिवले व फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. कंपनी मार्फत कंपनीचे असोसिएट डायरेक्टर प्रमोद चौधरी व तसेच बिझनेस कॉर्पोरेटर गणेश फराटे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या वॉकिंग इन इंटरव्यू मध्ये तीन राऊंड घेण्यात आले. त्यामधून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यासाठी संस्थेच्या सचिव मृणाल फराटे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत कांबळे, प्राचार्य डॉ. विवेक सातपुते, प्राचार्य प्रवीण कुरूमकर, एमफार्म कॉर्डिनेटर प्रा. संतोष वाघमारे व तसेच ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. वसंत पवार व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

00744

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT