पुणे

कळंब येथे महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

CD

महाळुंगे पडवळ, ता. २१ : कळंब (ता.आंबेगाव) येथील घोडनदीच्या तीरावर असलेल्या महादेव मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी भाविकांना केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले.
कळंब-महाळुंगे पडवळ रस्त्यालगत मंदिर असल्याने सकाळपासूनच मंदिराचा परिसर गर्दीने फुलला होता. पहाटे पुजारी श्रीकांत कुलकर्णी व ज्ञानेश्वर कानडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. कळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी भालेराव, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश कानडे, माजी सरपंच राजश्री भालेराव, माजी ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे, राजेश भालेराव, देविदास डोके, प्रदीप शिंदे, प्रगत शेतकरी शंकर कानडे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरास आकर्षक फुलांची सजावट केली आहे. एकलहरे, टाकेवाडी, नांदूर, विठ्ठलवाडी, साकोरे, लौकी, चांडोली बुद्रूक आदी गावांतील नागरिक येथे दर्शनासाठी आले होती. ज्ञानेश्वर कानडे व युवराज कानडे यांच्या वतीने केळी व चिक्कीचे भाविकांना वाटप करण्यात आले. शिवशंभो महादेव मंदिर परिसर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील कार्यक्रमाचे संयोजन केले.


01903

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT