पुणे

वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

CD

महाळुंगे पडवळ, ता. ३ : आंबेगाव तालुक्यातील कळंब-वर्पेमळा परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी (ता. ३) सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर या वन्य प्राण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले.
कळंब येथील वर्पेमळा येथून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर हा वन्यप्राणी गंभीर जखमी झाल्याची माहिती स्वप्नील भालेराव यांनी वनपाल शशिकांत मडके यांना दिली. तत्काळ वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू सदस्य घटनास्थळी हजर होऊन जखमी सांबर या वन्य प्राण्याला उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाली.
दरम्यान, कळंब वन विभाग परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दर्शन होत असते. त्याचबरोबर अनेक पाळीव जनावरांवर हल्ले देखील बिबट्याने केलेले आहेत. मात्र, सांबर हे वन्यप्राणी या परिसरात पहिल्यांदाच आढळून आले होते. मात्र, या सांबराच्या मृत्यूने या परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून त्याचा दफनविधी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT