पुणे

‘डिंभे’तील घोड शाखेतून पाणी सोडले आवर्तन

CD

महाळुंगे पडवळ/निरगुडसर, ता. १४ : डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून कळंब-गणेशवाडी (ता.आंबेगाव) येथून घोड शाखा कालव्यात सोमवारी (ता.१३) दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे लौकी गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील गावांनाही पिण्याचा फायदा होणार आहे.
कळंब-गणेशवाडी येथून डाव्या कालव्यातून घोड शाखा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. कळंबचा काही भाग, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या गावांना पाणी टंचाई जाणवत होती. परिसरातील बंधारे व पाझर तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली होती. गुरांचा चारा तसेच तरकारी पिकांना पाणी कमी पडत होते.

लौकी येथे बंधाऱ्यानजीक गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला होता. त्यामुळे गावाला दिवसाआड नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. पंचक्रोशीतील ६० विहीर व बोअरवेलमधील पाणी पातळीत घट झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन मका, गवत, घास आदी जनावरांचा चारा पाण्याअभावी वाढलेल्या तापमानामुळे सुकू लागला होता. त्यामुळे पाणी कधी येणार याबाबत नागरिक विचारणा करत होते, उपसरपंच मंगल विनोद थोरात यांनी सांगितले.

कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक कार्यालयाने कालव्यात पाणी सोडल्याने गावचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- एकता थोरात, सरपंच

थोरांदळे येथील शेतकऱ्यांकडून समाधान
डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या घोड शाखेला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने पिण्याचे पाणी, जनावरांची चारा पिकांना फायदा होणार आहे याबाबत थोरांदळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. थोरांदळे भागातील विहिरींनी तळ गाठला होता. जनावरांची चारा पिके पाण्याअभावी जळून गेली होती. यामुळे ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाकडे घोड शाखेला पाणी सोडण्याची मागणी केली होती. अखेर डिंभे धरणाचा घोड शाखेत उन्हाळी हंगामातील दुसरे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.


02353

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Municipal Council Election: गड राखला; पण नगराध्यक्ष गमावला! भाजपला उरण नगर परिषदेतील सत्ता राखण्यात यश

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

SCROLL FOR NEXT