पुणे

आजी पहात होती टीव्ही मागून आला बिबट्या!

CD

महाळुंगे पडवळ, ता. ८ : आंबेगाव तालुक्यातील कळंब व लौकी सरहद्दीवर असलेल्या सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टिव्ही पाहत होत्या. त्यावेळी घरात अचानकपणे बिबट्याने प्रवेश केला. घडलेल्या घटनेने घाबरुन न जाता आजीने प्रसंगावधान राखून मोठ्या धैर्याने प्रतिकार केल्यामुळे स्वतःला वाचविण्यात त्यांना यश आले. बिबटे अगदी घरात येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मीबाई थोरात या गेल्या वर्षभरापासून सुंभेमळा येथे एकट्या राहतात. घराचा दरवाजा उघडा ठेऊन लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे शनिवारी (ता. ६) रात्री घरात एकट्या टीव्ही पाहत होत्या. आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. कशाचा तरी आवाज आल्याने आजी समोर पाहतात तर दोन फुटांच्या अंतरावर बिबट्या उभा होता. अनाहूतपणे घडलेल्या या घटनेमुळे पूर्णपणे गोंधळून न जाता क्षणाचाही विलंब न करता आजीने धैर्याने प्रतिकार करून मोठ्याने आरडाओरड केला. त्यानंतर बिबट्याने पोबारा केला. लक्ष्मण थोरात, अथर्व थोरात, मोहन थोरात, भरत थोरात आदी परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात बिबट्या दत्तात्रेय राजाराम थोरात यांच्या उसाच्या शेतात निघून जाताना पाहिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याची मादी आणि दोन बछडे फिरत आहेत. अनेकांनी दिवसा फिरताना त्यांना पहिले आहे.

पिंजरा लावण्याची मागणी
लौकी, कळंब, चांडोली बुद्रूक आदी गावात बिबट्यांनी शेळ्या, मेंढ्या, बैल व वासरांचा फडशा पाडला आहे. कळंब येथील सुंभेमळ्यात अगदी घरात येऊन बिबटे हल्ले करू लागले आहेत. परिसरातील नागरिकांना अनेकदा बिबट्याने दिवसा दर्शन दिले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वेळ रात्री आठची होती. मी टीव्ही पाहत होते, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. अचानकपणे बिबट्या घरात केव्हा आला, ते मला समजलेच नाही. आवाज आल्याने फिरून पहिले, असता माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. गोंधळून न जाता धैर्याने प्रतिकार केला म्हणून माझा जीव वाचला आहे.
- लक्ष्मीबाई थोरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT