पुणे

महाळुंगे, साकोरे परिसरात कांदा, बाजरीला फटका

CD

महाळुंगे पडवळ, ता.४ : महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, कडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता.३) रात्री जोरदार पाऊस पडला. तब्बल एक तास पाऊस सुरू होता. कांदा, आंबा, तरकारी आणि बाजरी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाळुंगे पडवळ येथील सैदमळा, कोलदरा, पिंगळदरा, बारवेवस्ती, देसावळा ठाकरवाडी आदी भागात दोनवेळा जोरदार पाऊस झाला. तब्बल एक तास पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. साकोरे, चास, कडेवाडी, चांडोली बुद्रुक, कळंब, लौकी या भागात शेतकऱ्यांनी आंबा, तरकारी आणि बाजरी पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. या पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
आंबेगाव तालुक्यात सर्वत्र कांदा काढणी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतात अरण लावून ठेवलेला आहे. रात्री अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. शेतातील सखल भागात पाणी साचल्याने कांदे भिजले आहेत. हा कांदा कांदा चाळींमध्ये साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे मिळेल त्या बाजारभावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी माहिती शेतकरी विकास पडवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT