पुणे

चासच्या उपसरपंचपदी सुरेखा बारवे बिनविरोध

CD

महाळुंगे पडवळ, ता. ९ : चास (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज ग्रामविकास पॅनेलच्या सुरेखा शिवदत्त बारवे यांची बुधवारी (ता. ९) बिनविरोध निवड झाली. त्यामुळे येथील सरपंच आणि उपसरपंचपदावर महिला विराजमान झाल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज आले आहे.
चासच्या उपसरपंच कविता सतीश चासकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी सरपंच अर्चना दौलत बारवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यात सुरेखा बारवे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी वैशाली गवारी यांनी जाहीर केले. यावेळी माजी उपसरपंच कविता सतीश चासकर, माजी सरपंच सुजाता विक्रम बारवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ईश्वर चासकर, चंद्रकांत बाबूराव बारवे, श्रीकांत अभिमन्यू शेगर, कोमल गणेश काळोखे, दत्तात्रेय राघू भागवत, मनीषा संतोष चासकर, चांगुणाबाई वामन बारवे, बबन चिमाजी बारवे आदी उपस्थित होते.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा बारवे यांचा सत्कार केला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे, नानासाहेब बारवे, सतीश चासकर, दौलत बारवे, हनुमंत मानकर, मधुकर बारवे, शिवदत्त बारवे, शरद बारवे, बाळासाहेब चासकर, ज्ञानेश्वर भागवत, दत्ता बारवे, सुभाष भालेराव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT