महाळुंगे पडवळ, ता.१३ : कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१३) पहाटे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागातील कर्मचारी, शीघ्र कृती दल आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. त्याला विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
कळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शिरामळा येथील शेतकरी शेखर अण्णा भालेराव यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता. तर शेतकरी भालेराव हे विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतील पाण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावले. यावेळी त्यांना कोल्हा पडल्याचे निर्दशनास आले. भालेराव यांनी सुशील भालेराव यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे सांगितले. त्यांनी वनपाल शशिकांत मडके यांना घडलेला हा प्रकार मोबाईलवर सांगितला.
दरम्यान, वनरक्षक संपत तांदळे, गावडेवाडी बिबट शीघ्र कृती दलाचे मनोज तळेकर, चारुदत्त बांबळे, धर्मेंद्र ढगे, हर्षद चौधरी आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वन कर्मचारी, बिबट शीघ्र कृती दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने जाळीच्या सहाय्याने विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास दुपारी बाराच्या सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात वनविभागाला यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.