पुणे

चांडोली बुद्रुक येथे शेळीचा फडशा

CD

महाळुंगे पडवळ, ता.१३ : चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाभण शेळी ठार झाली आहे. ही घटना शनिवारी (ता.१२) मध्यरात्री घडली. गेल्या दहा ते बारा दिवसापासून दररोज या भागातील वाडीवस्तीवर बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चांडोली येथील मावकरमळ्यात भिमाबाई गीताराम मावकर यांनी गोठयाभोवती तारेचे कुंपण केले आहे. गोठ्यात एकूण तीन शेळ्या आहेत. शनिवारी (ता.१२) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने तार उचकटून गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यातून शेळीला बिबट्याने बाहेर काढली होती. भीमाबाई मावकर या सकाळी गोठ्यात गेल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुभाष मावकर आणि कैलास मावकर यांनी घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली. शेतकऱ्याचे १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनरक्षक प्रदीप औटी आणि वनसेवक जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

“चांडोली बुद्रक येथील वाडीवस्तीवर बिबट्यांच्या उपद्रव वाढला आहे. गेल्या दहा ते बारा दिवसापासून मावकरमळ्यात बछडा आणि बिबट्या शेतात आणि मावकरमळा ते सहानेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसलेला अनेकांनी पाहिले आहे. यामुळे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे,’’ असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुभाष विठ्ठल मावकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी गुरे रात्रीच्यावेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त करणे गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास जोरात आरडाओरडा करावा. गरज असल्यास पहाटे किंवा रात्री बाहेर समुहाने फिरावे. बिबट्या दिसल्यास खाली वाकू नये, बिबट्याचा पाठलाग करू नये. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पिंजरा लावण्याची व्यवस्था केली जाईल.
- सोनल भालेराव, वनपाल
--------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

SCROLL FOR NEXT