पुणे

इच्छुकांची घालमेल; आरक्षण सोडतीकडे लागले डोळे

CD

महाळुंगे पडवळ, ता. १६ : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणांची संख्या पूर्ववत झाली आहे. नगरपंचायत झाल्याने मंचर शहर बाहेर पडले आहे. त्यामुळे पूर्वीच्या गट आणि गण रचनेत मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू झाली असून डोळे आरक्षण सोडतीकडे लागले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांची आणि पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप प्रभागरचना सोमवारी (ता. १४) जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केली. या प्रभागरचनेवर सोमवारपर्यंत (ता.२१) हरकती नोंदविता येणार आहे. तालुक्यात मंचर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्याने मंचर शहर बाहेर पडले आहे. त्यामुळे पूर्वीच्या गट आणि गण रचनेत मोठे फेरबदल झाले आहेत. काही जणांच्या फायद्याचे तर काहींच्या तोट्याचे झाले आहेत.


जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण व त्यातील समाविष्ट गावे
शिनोली गट, बोरघर पंचायत समिती गण : आहुपे, पिंपरगणे, आघाणे, तिरपाड, डोण, न्हावेड, नानवडे, पाटण, पिंपरी, साकेरी, महाळुंगेतर्फे आंबेगाव, आसाणे, मेंनुबरवाडी, माळीण, आमडे, कुशिरे बुद्रूक, कुशिरे खुर्द, दिगद, मेघोली, कोंढरे, पंचाळे बुद्रूक, पंचाळे खुर्द, अडिवरे, वचपे, बोरघर, आंबेगाव, वरसावणे, फुलवडे, महाळुंगेतर्फे घोडा, कानसे, सुपेधर, चपटेवाडी, गंगापूर बुद्रूक, गंगापूर खुर्द, आपटी, आमोंडी, फलकेवाडी.
शिनोली पंचायत समिती गण : शिनोली, फदालेवाडी/उगलेवाडी, पिंपळगावतर्फे घोडा, पोखरकरवाडी, डिंभे खुर्द, मापोली, गोहे खुर्द, गोहे बुद्रूक, डिंभे बुद्रूक, कोलतावडे, कळंबई, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, नांदूरकीचीवाडी, तळेघर, फलोदे, सावरली, राजपूर, गाडेवाडी, कोंढवळ, निगडाळे, तेरुंगण.
घोडेगाव गट, घोडेगाव पंचायत समिती गण : घोडेगाव, आंबेगाव गावठाण, कोलदरा-गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, चिंचोली, नारोडी, गिरवली, रामवाडी, काळेवाडी-दरेकरवाडी, गवारवाडी, ढाकाळे, आंबेदरा, साल, तळेकरवाडी.
पेठ पंचायत समिती गण : पेठ, श्रीरामनगर, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, चिंचोडी, शेवाळवाडी-लांडेवाडी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी-कोटमदरा.
कळंब गट, कळंब पंचायत समिती गण : ठाकरवाडी, चास, कडेवाडी, महाळुंगे पडवळ, माळवाडी, ठाकरवाडी, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, नांदूर, लौकी, कळंब, चांडोली बुद्रूक पंचायत समिती गण : चांडोली बुद्रूक, खडकी, भराडी, थोरांदळे, नागापूर, जाधववाडी, रांजणी, वळती, भागडी.
पारगावतर्फे अवसरी बुद्रूक गट, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक पंचायत समिती गण : शिंगवे, निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक, काठापूर बुद्रूक, जारकरवाडी पंचायत समिती गण : पोदेवाडी, लोणी, वाळूंजनगर, खडकवाडी, लाखणगाव, देवगाव, जारकरवाडी, रानमळा, वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, धामणी, पहाडदरा.
अवसरी बुद्रूक गट, पिंपळगाव तर्फे महाळुंगे पंचायत समिती गण : वडगाव काशिंबेग, वाळूंजवाडी, एकलहरे, सुलतानपूर, तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, टाव्हरेवाडी, चांडोली खुर्द.
अवसरी बुद्रूक पंचायत समिती गण : अवसरी खुर्द, खडकमळा, शिंदेमळा, भोरवाडी, वायाळमळा, पारगाव तर्फे खेड, अवसरी बुद्रूक, गावडेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT