पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात कळंबला कालवड ठार

CD

महाळुंगे पडवळ, ता. ९ : कळंब (ता.आंबेगाव) येथील महानुभवमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड ठार झाली आहे. या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मंगळवारी (ता.९) सकाळी पिंजरा लावला आहे.
महानुभवमळयात विलास देवराम भालेराव यांच्या कालवडीवर सोमवारी (ता.८) सायंकाळी सहा वाजता बिबट्याला हल्ला करून तिला ठार केले. यामुळे शेतकऱ्याचे १० ते १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन भालेराव यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक संपत तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांसमवेत पिंजरा लावण्याची कार्यवाही केली.
दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून बाबूराव रभाजी भालेराव यांच्या घराजवळ दोन बिबटे येत आहे. तसा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. येथून ये-जा करताना भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकालाही बिबटे दिसले होते. या परिसरात शेतात काम करणाऱ्या नागरिकांनाही बिबट्याने दर्शन दिले असून डरकाळ्याचा आवाज येत आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
03309

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Rain Nakshatra : यंदा पाऊस कसा पडणार? नक्षत्र अन् वाहनांवरून मिळाले मोठे संकेत; जाणून घ्या पावसाबाबत काय म्हणते शास्त्र

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

SCROLL FOR NEXT