पुणे

नांदूर येथे सलग दुसऱ्या दिवशी प्राण्यांवर हल्ला

CD

महाळुंगे पडवळ, ता.१७ : नांदूर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१६) रात्री बिबट्याने पुन्हा हल्ला करून धनगर पलाजी तांबे यांची गाभण मेंढी ठार केली आहे. याच परिसरात शनिवार (ता.१५) रात्री बिबट्याने घोडी ठार केली आहे. त्यामुळे धनगरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोमवारी (ता.१७) पिंजरा लावला आहे.
नांदूर येथे स्मशानभूमीत परिसरात गेल्या दोन दिवसापासून धनगर पलाजी तांबे यांचा मेंढ्यांचा वाडा बसला आहे. रविवारी (ता.१६) रात्री बिबट्याने अचानकपणे हल्ला करून मेंढी ठार केली आहे. उपसरपंच शेखर चिखले यांनी वनविभागाला माहिती दिली. वनरक्षक संपत तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. १५ हजार रुपयांचे धनगराचे नुकसान झाले आहे. शनिवारीही याच मेंढपाळाची घोडी बिबट्याने ठार केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी एकाच ठिकाणी हल्ला होण्याची नांदूर गावातील ही पहिला घटना आहे. “विक्रम भालेराव, पूनम भालेराव, उल्हास भालेराव आदींनी शेतीची कामे करताना तर अमर नेमाने व गणेश वायाळ यांनी रस्त्यावरून जाताना बिबट्याला पहिले आहे. परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. उसाची तोड सुरू झाली असल्याने बिबटे सैरभैर झाले असावेत. शेतीकामांसाठी शेतमजूर येत नाहीत,’’ असे भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव यांनी सांगितले.

03455

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT