पुणे

सेंद्रिय खते, व्यवस्थापनाच्या जोरावर फुलविले वालवडीचे पीक

CD

महाळुंगे पडवळ, ता. २९ : नांदूर (ता.आंबेगाव) येथील सागर ज्ञानेश्वर चिखले व तनुजा सागर चिखले या दाम्पत्याने तेरा गुंठे क्षेत्रात सेंद्रिय खतांचा वापर केला व वालवडीचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांना चांगले उत्पादन मिळाले. आतापर्यंत १२ तोड्यातून एक हजार ५०० किलो उत्पादन निघाले आहे. सध्या ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. वालवडीचे उत्पन्न अजून सहा महिने मिळणार आहे. खर्च वजा जाता त्यांना ९० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

सागर चिखले यांनी जमिनीची खोलवर नांगरट करून बेड तयार करून घेतले. चांगले कुजलेले गांडूळ खत व स्लरी जमिनीत मिसळले. त्यानंतर ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरवर योग्य अंतरावर छिद्रे पडून घेतली. बीज प्रकिया करून ता.९ जुलै २०२५ रोजी वालवडीचे बियाण्याची लागवड केली. त्यासाठी अर्धा किलो बियाणे लागले. आधार दिल्यामुळे वेलीची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. वेलींना भरपूर सूर्यप्रकाश, हवा मिळाल्यामुळे शेंगाचा आकार एक सारखा वाढण्यास मदत झाली.

अशी केली लागवड
- सरीच्या दोन्ही टोकांना लाकडी डांब रोवले.
- त्यांना बाहेरील बाजूने १२ गेजच्या तारेने ताण दिला
- दोन्ही खांबांना १२ गेजची तार ओढावी. तीन मीटर अंतरावर बाबूंच्या कैचीने आधार दिला.
- वेल ५० सेंटीमीटर उंचीचे झाल्यानंतर बगलेचे फुटवे काढून वेल सुतळीच्या सहाय्याने वरच्या दिशेने चढवले.
- वेल तारेपर्यत जाईपर्यत बगलेची फूट काढून टाकली. काही काळानंतर फुटवे काढणे बंद केले.
- वेलीच्या फांद्या दोन दिशेला पसरल्या. त्यानंतर प्रत्येक फांदी ५० सेंमी लांबीवर खुडली.

लागवडीपासून ८० ते ८५ दिवसांनी वालवड पिकाच्या तोडणीला सुरुवात झाली. पिकाची साडे चार ते पाच फूट वाढ झाली असून पीक आता बहरात आले आहे. आठ ते दहा दिवसांनी पिकाची तोडणी केली जात आहे. पिकाची तोडणी सोपी असल्याने घरातील माणसेच पिकाची तोडणी वेळेत करतात. त्यामुळे मजुरीत बचत होत आहे.
- तनुजा चिखले


तेरा गुंठे क्षेत्रात वालवड पिकासाठी बियाणे, खते, औषधे व मजुरी असा एकूण १८ हजार रुपये खर्च आला. या वर्षी झालेल्या अतिपावसापासून पीक वाचविण्यात यश आले. सर्व खर्च वजा जाता त्यांना ९० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत जितेंद्र विश्वासराव यांच्यामार्फत विक्री केली जात आहे. वेलींची छाटणी करीत राहिल्यास वर्षभर उत्पादन मिळते. आई मीना व वडील ज्ञानेश्वर यांची मोलाची साथ मिळत आहे.
- सागर चिखले

लागवड : ता.९ जुलै २५
उत्पादन : एक हजार ५०० किलो
बाजारभाव : ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो
मिळालेले उत्पन्न : ९० हजार रुपये


03473

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT