महाळुंगे पडवळ, ता. २१ : महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. २१) दुपारी उसाच्या फडात तोडणी सुरू असताना अचानक तीन पिल्ले दिसल्याने ऊसतोड मजुरांची चांगलीच धांदल उडाली होती. मात्र, ती कोल्ह्याची पिल्ले असल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
महाळुंगे पडवळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊसतोड सुरू आहे. बुधवारी सकाळी भानुदास मारुती आवटे यांच्या उसाच्या शेतात दुपारी पिल्ले दिसल्याने घाबरून ऊसतोड मजूर तेथून लगेच सैरभर पळू लागले. आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. पाहणी केली असता बिबट्याचे बछडे नसून, कोल्ह्याची पिल्ले असल्याचे लक्षात आल्यानंतर ऊसतोड मजुरांना धीर आला. भीमाशंकर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी महेंद्र वाळूंज, अक्षय शेळके, प्रवीण घेवडे, भास्कर सैद, नितीन कोल्हे आदींनी भेट देऊन मजुरांना माहिती दिली. त्यानंतर काहीवेळ थांबविण्यात आलेली ऊसतोड सुरू करण्यात आली. वनविभागाला बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष गणेश गाडे यांनी माहिती दिली.
महाळुंगे, चास, कडेवाडी, साकोरे आदी परिसरात ऊसतोड सुरू झाल्याने तरस, रानमांजर, काळे उदमांजर, कोल्हे, मुंगूस, रसा आदी वन्य प्राण्यांची पिल्ले आढळून येत आहेत. नागरिकांनी पिल्लांना हात लावू नये किंवा घरी घेऊन जाऊ नये. पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनरक्षक रईस मोमीन यांनी केले आहे.
03553
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.