पुणे

महाळुंगे परिसरात शिवज्योतीचे स्वागत

CD

महाळुंगे पडवळ, ता .२० : आंबेगाव तालुक्यातील चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, कळंब, लौकी व चांडोली बुद्रुक आदी शिवजयंती आणि शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कळंब येथे ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान व साने गुरुजी कथामालेच्या वतीने शिवजयंती साजरी केली. राजमाता जिजाऊ आणि रायगडावर शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मंजुळाबाई मेहेर, सुमित्रा कामटकर यांनी केले. साई कानडे व प्रिया कानडे यांनी अनुक्रमे शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारली. कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विकास कानडे, संतोष कानडे, प्रिया विश्वासराव, ऋतुजा कानडे, नंदा कानडे, स्वराज कानडे, स्वरूप कानडे उपस्थित होते. शिक्षिका प्रगती कानडे यांनी आभार मानले.
महाळुंगे पडवळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे पूजन सरपंच सुजाता चासकर व ग्रामविकास अधिकारी वनवास वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाबाजी चासकर, ज्ञानेश्वर घोडेकर, तबाजी पडवळ, विकास पडवळ, अशोक डोके उपस्थित होते. नांदूर येथे भास्कर शिवले व लौकी अश्विनी टाव्हरे यांची व्याख्याने झाली. कळंब चौकात माजी सभापती उषा रमेश कानडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवव्याख्याते आकाश पाटील यांचे व्याख्यान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT