पुणे

कळंब येथे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

CD

महाळुंगे पडवळ, ता. २८ : कळंब (ता.आंबेगाव) येथे चोरट्यांनी बंद घरे, दुकाने, दुचाकी गॅरेज आदी ठिकाणी चोरीचा सपाटा लावला आहे. मंगळवारी (ता.२४ फेब्रुवारी) व बुधवारी (ता. २५फेब्रुवारी) या कालावधीत पाच ठिकाणी चोरी करून मोटारसायकल, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व साहित्य असे एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कळंब येथे मंगळवारी (ता.२४) अपंग प्रहार संघटनेचे कोषाध्यक्ष मोहन उर्फ बाळू बबन भालेराव यांचे दुकान चोरट्यांनी फोडले. दोन हजार रुपये रोख रक्कम, खाण्याचे साहित्य,व इतर किरकोळ घरगुती वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. तावजीमळा येथील दशरथ गणपत भालेराव यांच्या बंदिस्त बंगल्याचे कुलूप कटरने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या दोन नथा, एक वाटी, सोन्याचे मणी, अंगठी, दोन कुड्या असे एकूण एक ते सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे दागिने, ४ जोडवी, ४ पैंजण जोड, कंबर साखळी आदी पंधरा तोळे चांदी, रोख रक्कम ४० हजार रुपये असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. बुधवारी (ता.२५) रात्री ओम शांती केंद्राचे सुद्धा कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाज आल्याने आरडाओरडा केल्याने चोरटे पळाले. महानुभावमळा येथील प्रशांत दिलीप भालेराव यांचे बंदिस्त घर फोडले. सुदैवाने या घरात काही मौल्यवान वस्तू नसल्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले नाही. गणेश वायाळ यांच्या श्रीराम ऑटोमोबाईल दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. आठ दिवसांपूर्वी संजय वायकर यांची दुचाकी घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे. मंचर पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष मांडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मंचर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT