पुणे

चांडोली शाळेत ‘एआय अँड रोबोटिक्स लॅब’

CD

महाळुंगे पडवळ, ता. २४ : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत २१ लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘एआय अँड रोबोटिक्स लॅब’ची ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी नुकतीच पाहणी केली. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद, सिमु सॉफ्ट कंपनी आणि ग्रामपंचायत यांच्या भागीदारीतून ही लॅब सुरू करण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स व रोबोटिक्सचे प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण मिळेल. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला. मान्यवरांनी यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
याप्रसंगी यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, प्रीती थोरात, संदीप थोरात, केंद्रप्रमुख सीमा कहडने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT