पुणे

पिंपरीत ''बायोफॉल्क फिश''प्रकल्पाचे भूमिपूजन

CD

माळशिरस, ता. २४ : पिंपरी (ता. पुरंदर) येथे कृषिभूषण महादेव शेंडकर यांनी बायोफॉल्क फिश फार्मिंग प्रकल्पाचे भूमिपूजन आपल्या शेतात केले. या प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत कमी पाण्यात मत्स्य पालन करून अधिक उत्पन्न घेतले जाते.
जमिनीत दोन मीटर उंचीचे शेततळे बनवून त्यामध्ये अति घनत्वामध्ये मत्स्यपालन केले जाते. रींग ब्लोअरच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिक्स केला जातो तसेच माशांचे वेस्ट हे बॕक्टेरीयाच्या माध्यमातून बुजविले जाते व माशाचे वेस्ट हे रिसायकल करून पुन्हा फीड म्हणून वापरले जाते. यामुळे माशाच्या खाद्यावरील खर्च हा ३० टक्के कमी होतो. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३० लाख रुपये आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी शेंडकर यांनी बिहार येथील पाटणा, मध्यप्रदेश येथील दत्तीया, रायगड, हिंजवडी आयटी पार्क पुणे अशा विविध ठिकाणे प्रशिक्षण घेतले आहे.
उद्‌घाटनप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष विजय थेऊरकर, माजी सरपंच मीना शेंडकर, उत्तम हंबीर, हरिश्चंद्र थेऊरकर, संपतदादा शेंडकर, पांडुरंग गायकवाड, सुखदेव हंबीर, बाबूराव शेंडकर, शंकरदादा शेंडकर, प्रवीण मारणे उपस्थितीत होते.

01260

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT