पुणे

शेवंती फुलांच्या उत्पादकांना नवरात्रोत्सवात लक्ष्मी पावली

CD

माळशिरस, ता. १३ : फुलांमध्ये सुगंधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शेवंतीवर्गीय ‘शेंट व्हाइट ही फुले बाजारात मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे व मोठ्या प्रमाणात असलेल्या मागणीमुळे नवरात्रोत्सवाच्या अगोदरच या फुलांना शुक्रवारी (ता. १३) दीडशे रुपये किलोपर्यंत भाव मिळाला.
गणपती उत्सवाच्या अगोदरपासून मागील दोन महिन्यांपासून कोसळलेले फुलांचे बाजारभाव नवरात्रोत्सवाच्या काळात तरी वाढतील का नाही, अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना भीती होती. मात्र, मध्यंतरीच्या पावसामुळे शेवंतीवर्गीय भाग्यश्री फुले खराब झाल्यामुळे बाजारात शेवंतीवर्गीय फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या नव्याने सुरु झालेल्या शेंट व्हाइट फुलांना मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी आहे. त्यामुळे या फुलांना पुणे येथील बाजारात दीडशे रुपये किलो भाव मिळाला. सुवर्णा यलो, ऐश्वर्या ही फुले देखील शंभर ते दीडशे रुपये किलो विकली गेली. झेंडू चाळीस रुपये किलो विकला गेला. त्यामुळे फूल उत्पादक आनंदी दिसत होते.

या वर्षी दुष्काळात पाण्याचा अत्यंत तुटवडा असताना शेंट व्हाइट फुले जगवली. सध्या नवरात्रोत्सवामुळे वाढलेल्या मागणीमुळे चांगले पैसे होईल, ही आशा आहे.
- शरद गायकवाड, फूल उत्पादक

या वर्षी शेंट व्हाइट फुलांची लागवड कमी असल्याने मागणीच्या तुलनेत कमी फुले बाजारात येत असल्याने नवरात्रोत्सवाच्या व दिवाळी या दोन्ही सणाच्या काळात चांगले बाजारभाव राहतील.
- मोहन कुंजीर,
फूल आडतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT