माळशिरस, ता.१५: गणपती बाप्पाचे विसर्जन दोन दिवसांवर आल्याने फूल बाजाराला उतरती कळा लागली आहे. शंभर दीडशे रुपये किलोपर्यंत विकला गेलेला झेंडू रविवारी (ता.१५) नाममात्र दहा रुपये किलो दराने पुणे बाजारात विकला गेला तर दोनशे पार झालेली शेवंती पन्नास रुपये किलोपर्यंत विकली. यामुळे उत्पादकांच्या चेहरा कोमेजून गेल्याप्रमाणे दिसत होते.
मागील दहा दिवसापासून गणपती स्थापनेच्या अगोदर दोन दिवसांपूर्वीपासून व गौराईच्या काळात यंदा सर्वच फुलांच्या बाजारभावाने उच्चांक केला होता. विशेषतः गौराई विसर्जित होण्यापर्यंत सर्वच फुलांचे बाजारभाव चढ्या दराने होते. मात्र, गौराई विसर्जित होऊन पाच दिवसांच्या गणपतीनंतर जसजसे गणपती विसर्जित होऊ लागले व आता अवघ्या दोन दिवसावर गणपती विसर्जन आलेले असताना पुणे येथील फूल बाजारामध्ये सर्वच फुलांचे बाजारभाव कोसळलेले. झेंडूची फुले दहा रुपयांपासून ते ४० रुपये किलोपर्यंत विकली गेली. शेवंती वर्गीय भाग्यश्री ५० ते ८० रुपये दराने विकली गेली. कापरीची फुले दहा ते तीस व बिजली ८० ते१०० रुपयांपर्यंत विकली गेली. बाजारात सर्वच फुलांच्या दरामध्ये घसरण पहावयास मिळाली.
पित्रु पंधरावड्यातील बाजारभावाचा अंदाज
फूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या सर्वच उत्पादकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. पुढील दोन दिवस तरी बाजार समाधानकारक राहतील, असे वाटत होते असे फूल उत्पादक राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात रविवारी झालेल्या बाजारभावामुळे पुढील पित्रु पंधरावड्यामध्ये काय बाजार असतील याचा अंदाज फूल उत्पादक करू लागले आहेत .
बाजारात सध्या मागणीमध्ये घट झाली असल्याने बाजार भाव जरी कोसळले असले तरी देखील पुढील पित्रु पंधरावडा सरल्यानंतर नवरात्र उत्सवात परत एकदा बाजाराचा उच्चांक पहावयास मिळेल व फूल उत्पादकांना चांगल्या प्रकारचा बाजार भाव मिळू शकेल.
- मयूर वाघले, फूल उत्पादक
02023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.