पुणे

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुरंदर उपसा योजना ठप्प

CD

माळशिरस, ता.१७ : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर उपसा पाणी योजना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिन्यापासून बंद आहे. सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना मागील लाभार्थी शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे देण्याची वेळ आली आहे. योजनेची देखभाल दुरुस्तीची कामे पाहणारी एजन्सी वारंवार बदलली जात आहे. यामुळे ऐन पाण्याची गरज असताना शेतकऱ्यांना योजनेचे पाणी मिळत नसल्याची पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

पुरंदर तालुक्यात भागामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असणारी पिके वाचवण्यासाठी व नव्याने रब्बी हंगामातील कांदा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी सासवडपासून पूर्वेकडील गावांमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. ही सर्व गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये येतात. यामुळे लाभ क्षेत्रातील या गावांचे योजनेचे पाणी मिळण्यासाठी मागील महिनाभरापासून मागणी आहे. यासाठी शेतकरी योजनेच्या अधिकारी वर्गांना फोन करून विनवणी करत असताना दुरुस्तीचे काम चालू असून दोनच दिवसांमध्ये पाणी सुरू होईल, असे महिन्याभरापासून अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत मात्र, महिना उलटून ही योजना सुरू होत नसल्याने याबाबत सखोल चौकशी करता तीन महिन्यापूर्वी या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुजरात येथील एका एजन्सीला देण्यात आलेले होते. या एजन्सीला तीन महिन्यांमध्ये एकदा ही योजनेचे दोन्ही पंप एका वेळेस सुरू करता आले नाहीत. शासनाने मागील महिन्यात १३ सप्टेंबरला या एजन्सीचे काम थांबून आता नव्याने सांगली येथील सह्याद्री एंटरप्राइजेस या एजन्सीला हे काम दिल्याचे समजत आहे. शासन व प्रशासन स्तरावरील या भोंगळ कारभारामुळे याची किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागत असून शेतातील पिके जळून गेल्यानंतर शासन जागी होणार का असा खरबरीत सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.


पुरंदर उपसा योजनेचे नदीवर पंपग्रहाच्या ठिकाणी कचरा काढण्याचे काम चालू असून दोन दिवसात हे काम संपून योजना नव्याने सुरू होईल व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाण्याची टंचाई असलेल्या भागात प्राधान्याने पाणी दिले जाईल .
उत्तमराव शिंदे, उपविभागीय अभियंता पुरंदर उपसा सिंचन योजना सासवड कार्यालय


गुजरात येथील एजन्सीचे १३ सप्टेंबर रोजी काम थांबवण्यास सांगण्यात आल्यानंतर नव्याने एजन्सी देण्यात आलेली असून, तिने काम सुरू केल्यानंतर योजना सुरू करता येईल.
- नितीन जयस्वाल कार्यकारी अभियंता, यांत्रिक विभाग


पूर्व भागातील माळशिरस, राजुरी, नायगाव आदी परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शेतातील पिकांवरच जनावरांना चाऱ्याचा देखील प्रश्न यामुळे निर्माण होऊ लागला. सध्या पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. वारंवार विनंती करून ही योजना सुरू होत नाही. दोन दिवसात योजना सुरू करावी.
- रामदास वाघळे, शेतकरी, माळशिरस

02053

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रीतिसंगमावर सुनेत्रा-सुप्रिया एकत्र! टप्प्याटप्प्याने समाधीस्थळी आगमन; काही काळ एकत्रित उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Nvidia CEO Jensen Huang : एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग डिप्रेशनमध्ये? पत्नीची जाहीरपणे माफी; रोज घेतात दीड तास समुपदेशन

Marathi Short Film: व्याधीपलीकडील भावविश्वाचा शोध; सावंतवाडीतील कलाकारांच्या ‘दर्या’ लघुपटाला प्रतिसाद

एका पक्षाकडून निवडणूक जिंकली नंतर पक्षांतर... आता निवडणुकीचा खर्चही वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Koyna Dam Project: कोयनासाठी पाच जीवांचे बलिदान; पेठवडगावातील कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच

SCROLL FOR NEXT