माळशिरस, ता. १२ : पुरंदर, दौंड तालुक्यातील विठ्ठल भक्तांनी सुरु केलेले भुलेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळ बत्तीस वर्षांपासून पंढरपूरमध्ये वाळवंटात हरिनाम घोष करत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पाडते. भुलेश्वर सेवा मंडळाने नंतरच्या काळात पंढरपूरमध्ये जागा खरेदी करून बांधकाम करत मंडळाचा आश्रम सुरु केला. कोरोना काळातील अपवाद वगळता अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी आयोजित केला जातो. यामध्ये सात दिवस काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा वाचन, भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम होतात. शंकर महाराज आखाडे यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्यांची मुले गणेश महाराज आखाडे व बाळासाहेब आखाडे हे ही परंपरा चालवत आहे. यंदाच्या हरिनाम सप्ताहाची सुरुवात बुधवारी (ता. ५) पंढरपूरमध्ये सुरु झाली त्याची सांगता गणेश महाराज आखाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सप्ताह काळात श्लोक महाराज ताम्हाणे, सुजत महाराज जगदाळे, वेदांत महाराज आखाडे, नाना महाराज काळे, बापू महाराज गाढवे, गणेश महाराज वाचले, दिगंबर महाराज जाधव यांचे कीर्तन झाले. तर ओंकार महाराज देवकर, गणेश महाराज डुबे, तेजस महाराज शेलार, महादेव महाराज खराडे, रमेश महाराज दुधाट, कान्होपात्रा खराडे यांची प्रवचने झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.