माळशिरस, ता.२५ : गणेशोत्सवामुळे पुणे येथील फूल बाजारात विविध फुलांना सोमवारी (ता.२५) हंगामातील उच्चांकी बाजारभाव मिळाला. शेवंतीवर्गीय फुले प्रतिकिलो २०० ते २८० रुपये प्रतिकिलोपर्यंत तर गुलछडी बाराशे रुपये एवढ्या चढ्या बाजारभावाने विकली गेली. चालू वर्षाच्या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी बाजारभाव ठरला आहे. यामुळे गणरायाची कृपाच बरसली असल्याची भावना यावेळी फूल उत्पादकांनी व्यक्त केली.
अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव आला आहे. गणपती मंडळ व घरोघरी गणरायाच्या स्वागतासाठी तसेच सजावटी करता फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पुणे शहर तसेच तसेच जिल्ह्यातील गणपती मंदिरात फुलांची आकर्षक सजावटी करण्यात येते. त्यामुळे पुणे येथील फूल बाजारामध्ये फुलांच्या खरेदी करता ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आज झुंबड होती. दरम्यान, सध्या बाजारात फुलांची आवक अपेक्षित होत नसल्याने पुणे येथील गुलटेकडी फूल बाजारात हंगामातील आणखी नवा बाजाराचा उच्चांक पहावयास मिळाला. पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारभावात वाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून आले. बाजारभाव वाढल्याने फुल उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
पुणे बाजारातील सोमवारचे बाजारभाव
फुलाचे नाव.......बाजारभाव (प्रतिकिलो)
भाग्यश्री व्हाइट.......२०० ते २३०
प्रमिला यलो.......२५० ते ३००
सूवर्णा यलो.......२५० ते २८०
सेंट व्हाइट.......२८०
पर्पल.......१३० ते १८०
झेंडू.......७० ते १००
कापरी.......६० ते १००
बिजली.......१८० ते २२०
गुलाब.......२०० ते ३००
अस्टर.......२००
गुलछडीचा बाजारभावात चढ उतार
गुलछडी फुलांचा बाजारभाव आज पहाटे उच्चांकी स्वरूपात पहावयास मिळाला. पहाटे पाच वाजता चांगल्या प्रकारच्या दांडा गुलछडी साडेसातशे रुपये पासून ते १२०० रुपयापर्यंत किलोला बाजार भाव मिळाला. त्यानंतर उशिरा अकरा वाजता येणाऱ्या गुलछडीला ४८० रुपये ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
गणपती उत्सव ठरणार सुवर्णकाळ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात व्यापारी वर्गाकडून फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, फुलांच्या असलेला तुटवडा यामुळे गणपती व गौराई या काळात फुलांच्या बाजारभाव दररोज नवनवीन उच्चांक मागील तीन दिवसांपासून करत आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये बाजारात आणखीन वाढ झालेली यामुळेच पहावयास मिळेल. यामुळे ज्या फूल उत्पादकांची यंदा फुले विक्रीसाठी येत आहेत त्यांच्यासाठी निश्चितपणे गणपती उत्सव सुवर्णकाळ ठरणार आहे, असा अंदाज मार्केट यार्डामधील दलालांची व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात अतिवृष्टी व नंतर मागील दोन महिन्यांत सतत असणारे ढगाळ हवामान होते. यामुळे फुलांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. मात्र, चालू स्थितीत असणारे बाजारभाव पाहता कमी फुलांना चांगला चांगला बाजारभाव मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.