पुणे

पुरंदर उपसा योजनेची गळती थांबणार

CD

माळशिरस, ता. २५ : पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीच्या कामाकरिता निधीची उपलब्धता झाल्याने योजनेच्या वितरिकेतून अनेक ठिकाणी, तसेच नादुरुस्त वॉल्व्ह व इतर कारणांनी होणारी गळती पुढील काळात हे काम होऊन थांबणार आहे. यामुळे योजनेच्या लाभार्थी भागातील शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजना सुरू होऊन २० वर्षाचा कालावधी होत आला आहे. यामुळे या काळात योजनेचे पाणी चालू झाल्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पुण्यातील रसायन मिश्रित सांडपाणी असल्याने वितरिकेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन अनेक ठिकाणी वितरिका नादुरुस्त होऊन पाण्याची गळती होणे, त्याचप्रमाणे एअर वॉल्व्हची मोठ्या प्रमाणात झीज होऊन पाण्याची गळती होत आहे. याचा मोठा फटका योजनेच्या वितरिकेवर टेलच्या शेतकऱ्यांना बसत होता. यामुळे योजनेच्या दुरुस्तीचे काम होऊन एअर वॉल्व्हची गळती थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याने लाभार्थी भागातील शेतकऱ्यांची आमदार विजय शिवतरे यांच्याकडे ही सातत्याने मागणी होती.
शेतकऱ्यांच्या या मागणीनुसार योजनेची वितरिकेची दुरुस्ती व इतर कामांसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाले असल्याची माहिती आमदार शिवतारे यांनी दिली. यामुळे पुढील काळात ही गळती थांबवण्यासाठी आवश्यक ते उपयोजना करण्यात येईल. योजनेच्या कामासाठी यापूर्वी ५६ कोटी रुपये व आता नव्याने तेवढाच ५६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी भेटली आहे, असेही त्यांनी सांगितले.

02631

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: भारतीय कर्णधारावर ICC ने कारवाई केली, BCCI ची सटकली! थोपटले दंड, प्रकरण आता आणखी तापणार...

Visa Free Countries: व्हिसा फ्री प्रवास करायचा आहे? या ५८ देशांमध्ये फिरा एकदम बिनधास्त, मिळवा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

आलाय 'टीजर' व्हा 'हजर'..!! ‘वेल डन आई’ची प्रेक्षकांना उत्सुकता; विशाखा सुभेदार दिसणार हटके भूमिकेत

Kolhapur News : पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

IND vs SL Live: जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू खेळाडूला विश्रांती; दोन बदलांसह टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करणार

SCROLL FOR NEXT