पुणे

सिद्धेश्वर देवस्थानाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

CD

माळशिरस, ता. ५ : जेजुरी एमआयडीसी येथील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून नायगाव (ता. पुरंदर) येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानास दिलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
देवस्थान परिसरातील रिसे, पिसे, राजुरी, माळशिरस, मावडी सुपे, पिपंरी, पांडेश्वर या गावांना रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळे नायगाव ग्रामस्थ व भाविकांनी कंपनीकडे रुग्णवाहिका मागणी केली होती. त्यानुसार कंपनीत कार्यरत गावातील मोहन चौंडकर यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर तिचा लोकार्पण सोहळा पौर्णिमेचे व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत संपन्न झाला.
यावेळी रुग्णवाहिका भेट देताना कंपनीचे सीएसआर विभागाचे प्रमुख निशाद सलाम, वरिष्ठ एचआर मोहन चौंडकर, उत्पादन व्यवस्थापक बाळासाहेब खेसे, कर्मचारी नीलकंठ गाडेकर, किशोर कामथे, हरिश्चंद्र शेंडकर, प्रकाश कड, सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण चोपडा, विश्वस्त डॉ. दशरथ ठवाळ, अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीकडून रुग्णवाहिका मिळाल्यामुळे श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत,पंचक्रोशी व नायगाव ग्रामस्थ यांच्यावतीने कंपनीचे आभार मानण्यात आले.

02780

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांच्याकडे इंडोनेशिया शिष्टमंडळाचे नेतृत्व, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये नियुक्ती

"मासिक पाळीवेळी बाहेरगावी आई पॅड वापरायला द्यायची नाही" सुधा चंद्रन यांचा धक्कादायक खुलासा; "तर दोष लागेल.."

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT