माळशिरस, ता.१० : ‘‘बैलगाडा शर्यत ही केवळ परंपरा नसून ती ग्रामीण संस्कृती आहे. शेतकऱ्यांची मेहनत, गोधनावरील प्रेम आणि गावागावांतील एकतेचे जिवंत प्रतीक असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत असून, बैलगाडा शर्यतीतून गोधनाचे जतन होत आहे,’’ असे मत अमोल कामठे यांनी व्यक्त केले.
श्री पारेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे अमोलदादा कामठे मित्र परिवार यांच्या वतीने ‘हभप अमोलदादा केसरी २०२६’ बैलगाडा शर्यत पार पडली.
बैलगाडा शर्यतीत प्रथम मानाचा पुरस्कार मल्हार फॅन्स क्लब, खेड यांनी मिळवला. त्यांना एक लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस व मानाची ढाल देऊन प्रा. दिगंबर दुर्गाडे व अमोल कामठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘एक आदत-एक बैल’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेने बैलगाडा शौकिनांमध्ये विशेष आकर्षण निर्माण केले होते. ही बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडा संघटना, पुरंदर यांच्या नियमांनुसार पार पडली. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच पुरंदर तालुक्यातून बैलगाडा प्रेमींनी शर्यतीसाठी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, शिवाजी साळुंखे, रामदास मेमाणे, अजिंक्य कड, संदेश पवार, सुभाष मेमाणे, दत्तात्रेय मेमाणे, पप्पू मेमाणे, स्वप्नील गायकवाड, ऋत्विक मेमाणे, प्रशांत खळदकर, आदित्य बंड, निखिल जगताप, नीलेश पंडित, सूरज मेमाणे, प्रज्वल मेमाणे, आविष्कार मेमाणे, ओंकार मेमाणे, संदीप मेमाणे, अविनाश कटके, अभिषेक बंड, शुभम केदारी, विश्वास खैरे, दीपक मेमाणे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना दुर्गाडे यांनी सांगितले की, बैलगाडा शर्यती सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. रोमहर्षक स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम : जय बाळूमामा बंटी (डॉ. खेड)-मल्हार फॅन्स क्लब, खेड, द्वितीय: खंडोबा प्रसन्न कार्तिकेय (अजय जाधव, कलेढोन)- ढोन बूथ, मुळीकवाडी, तृतीय/चतुर्थ: आई एकवीरा प्रसन्न (पै. सोन्याडायवर)- रामू कुमार चव्हाण, रामूसवाडी व शिवशंभो प्रसन्न- आप्पाशेठ खळदकर, पंचक्रोशी. पंचम: पारेश्वर प्रसन्न/नाथासाहेब प्रसन्न / मोरया प्रसन्न- सूरज दत्तात्रेय मेमाणे, पारगाव मेमाणे, सहावा: श्रीकन्या- प्रमोद घुले, महंमदवाडी, पुणे, सातवा: संत बाळुमामा प्रसन्न-मोनिशशेठ गायकवाड, आदित्यशेठ बंड, बाळासाहेब बबन मेमाणे, आठवा: मोरया प्रसन्न- काका तावरे, मोरगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.