पुणे

आंबळे येथे सेंद्रिय स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी

CD

माळशिरस, ता.१७ : आंबळे (ता.पुरंदर) येथील उच्चशिक्षित महिला उद्योजिका विद्या विठ्ठल जगताप यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या जगताप यांनी शेती क्षेत्रात काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या हेतूने स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला आणि यशस्वी उत्पादन घेतले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालत चांगले उत्पादन मिळविण्यात यश संपादित केले आहे.
जगताप यांनी आजपर्यंतच्या उत्पादनातून पाच गुंठ्यांत सुमारे ६०,००० रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. कमी क्षेत्रात, कमी खर्चात आणि सेंद्रिय पद्धतीने घेतलेला प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. पारंपरिक पिकांपेक्षा वेगळे, कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरीची निवड केली. आंबळे येथे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी पाच गुंठे क्षेत्रावर सुमारे १९०० स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. ही रोपे वाई येथून आणण्यात आली. एका रोपाची किंमत केवळ तीन रुपये इतकी होती. बेड पद्धतीने मल्चिंग करून शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे १५,००० रुपयांचा खर्च आला.

नैसर्गिक पद्धतीने उत्पादन
सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत विद्या जगताप यांनी लागवडीपूर्वी घरच्या देशी गाईंचे कुजलेले शेणखत वापरले. तसेच घरच्या देशी गाईंपासून मिळणाऱ्या शेण व गोमूत्राचा प्रभावी वापर केला. लागवडीनंतर गोशाळेतच तयार केलेले जीवामृत दिले जाते. आवश्यकतेनुसार ताक व गोमूत्राची फवारणी करून पिकाची जोपासना केली जाते. कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन घेतले जात आहे.

व्हॉट्सपॲपद्वारे प्रभावी मार्केटिंग
स्ट्रॉबेरी विक्रीसाठी विद्या जगताप पारंपरिक बाजारपेठेची आवश्यकता भासली नाही. त्यांनी व्हॉट्सपॲप मार्केटिंगचा प्रभावी वापर करून थेट ग्राहकांपर्यंत स्ट्रॉबेरी पोचविली. सुरुवातीला नातेवाइकांना विक्री करण्यात आली. यानंतर ग्राहकसंख्या वाढत गेली. गावातील ग्राहकांसोबतच पुणे येथील निवासी सोसायट्यांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली.

शेतीमध्ये पारंपरिक पद्धती बरोबर आधुनिक तिची जोड देऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास कमी खर्चामध्ये शेती निश्चित फायदेशीर होऊ शकते याकरता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पाहिजे. आधुनिक काळानुसार नवनवी पिके घेतली पाहिजेत.
- विद्या जगताप, स्ट्रॉबेरी उत्पादक

02847

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT