पुणे

माळशिरस आरोग्य केंद्राकडून घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी

CD

माळशिरस, ता. ३ : माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये ज्येष्ठ, बेड रिडन रुग्णांसाठी घरपोच सेवा देत तपासणी करून उपचार करत आहेत.
ज्येष्ठ, बेड रिडन रुग्णांना घरपोच सेवा देण्यासाठी सरकारच्या वतीने पेलीवटे केअर प्रोग्रॅम (Palliavte care program) राबवला जात आहे. पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभंकर देशमुख व डॉ. प्रियांका साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य केंद्रातील गावात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना त्यामध्ये सर्व गरोदर महिलांची तपासणी व गुंतागुंतीचे बाळंतपण यावरती विशेष लक्ष, शाळेत जाऊन मुलांना स्वच्छतेचे धडे, कुमारवयीन मुलींसाठी विशेष काळजी त्याचप्रमाणे आरोग्याबाबत योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. क्षयरोग रुग्णांसाठी चालती फिरती एक्स-रे व्हॅन एकाच दिवसात रिपोर्ट दिले जातात.

अनेक रुग्णांसाठी घराबाहेर पडणे वृद्धापकाळात शक्य होत नाही. अंथरुणाला खिळून पडलेल्या रुग्णांसाठी गावोगावी फिरून सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.
-डॉ. प्रियंका साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT