माळशिरस, ता. ११ : माळशिरस (ता. पुरंदर) गावामध्ये ग्रामस्थांचे नवीन रेशनिंग कार्ड, दुबार कार्ड, नवीन नाव लावणे यासाठी पुरंदर तहसीलमधील पुरवठा विभागाने घेतलेल्या शिबिरात ३०० लाभार्थी रेशनकार्ड धारकांना बुधवारी (ता. ११) पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांचे हस्ते कार्ड वाटप करण्यात आले.
गावातील नागरिकांची रेशनिंग कार्ड संदर्भात अडचणी असल्याने सरपंच आरती यादव व पंचायती समिती सदस्य यादव यांनी तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधून गावातच नागरिकांच्या रेशनिंग संदर्भातील अडचणी दूर व्हावी, त्याकरता २६ सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानुसार आलेल्या अर्जांची छाननी, पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांचे रेशनिंग कार्ड तयार करून बुधवारी वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये जवळपास ३०० लोकांचे कार्ड काढणे व नवीन नावे लावण्याची कामे केलेल्या कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मण महाराज यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सहजरीत्या हे रेशनिंग कार्ड उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
02873
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.