पुणे

राजुरीच्या आखाड्यात महिंद्रची बाजी

CD

माळशिरस, ता. २ : राजुरी (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित जंगी कुस्ती आखाड्यात उपमहाराष्ट्र केसरी महिंद्र गायकवाड याने मध्य प्रदेशच्या वैभव शर्माला चितपट करत ५ लाख ८१ हजार रुपयांचे मुख्य इनाम पटकावले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या आखाड्यात राज्यभरातील मल्लांनी हजेरी लावली होती.
येथील भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त यंदा ७५ नियोजित कुस्त्यांचे आयोजन केले होते. मुख्य लढतीत महिंद्र गायकवाडने ‘गुठणी’ डावावर वैभव शर्माला आसमान दाखवले. तत्पूर्वी, दुसऱ्या क्रमांकाच्या अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरच्या रोहन पवारने रशियाच्या झुभेर याला गुणांवर पराभूत करत २ लाख ७० हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. सव्वा तास चाललेल्या या कुस्तीने शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या आखाड्यासाठी उद्योजक हरिभाऊ भगत, माजी सरपंच कृष्णाजी भगत यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले. कुस्तीचे पंच म्हणून वासुदेव बनकर, अंकुश भगत, आप्पा भंडलकर यांनी काम पाहिले, तर सागर चौधरी व अनिकेत कदम यांनी निवेदन केले. यात्रेनिमित्त अभिषेक, छबिना आणि रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य कार्यक्रमही पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

02914

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT