पुणे

भोरमध्ये उसाचा रस, शीतपेयांना पसंती

CD

महुडे, ता. ४ : भोर-महाड रस्त्यावरील मांगीर ओढ्याजवळ रस्त्यालगत असलेले लाकडी रसवंती गृहावर उन्हाची काहिली क्षमविण्यासाठी नागरिक थांबत आहे. हे रसवंती गृह रामचंद्र नथू जेधे (वय ७८, रा.कारी ता.भोर) हे भोर-महाड रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत गेली १०-१२ वर्षांपासून चालवत आहेत.

भोर तालुक्यात ३७ अंश सेल्सिअस तापमान असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. तीव्र उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे आरोग्याला फायदेशीर असणारा उसाचा ताजा रस व शीतपेयांना नागरिक पसंती देत आहेत.

कोकणात, पश्चिम भागात ये-जा करणारे, तसेच भोर शहरातील नागरिक झाडांच्या सावलीत असलेल्या जेधे यांच्या रसवंती गृहावर रस पिण्यासाठी आवर्जून थांबतात. जेधे यांनी उसाच्या गाळपाचे लाकडी गुऱ्हाळ व ते फिरवण्यासाठी पेट्रोलवर चालणारे एक मशिन बसवलेले आहे. जेधे यांनी हे मशिन नगर येथून ८० हजार रुपयांना आणले आहे. रसवंतिगृहासाठी जेधे पुणे येथून ६ हजार टनाप्रमाणे ऊस खरेदी करतात. मशिनला दररोज दोन लिटर पेट्रोल लागते. सर्व खर्च जाऊन यांना सरासरी ८०० रुपये दररोजचे शिल्लक राहत असे जेधे यांनी सांगितले.

00598

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT