पुणे

नीरा देवघर धरण परिसरास वळिवाने झोडपले

CD

महुडे, ता.११ : भोर तालुक्यातील हिरडस मावळातील नीरा देवघर धरण परिसरास शनिवारी (ता.११) विजांच्या कडकडासह वळीव पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी रचून ठेवलेला पेंढा‌ तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले. आंबवडे मार्गावरील नाटंबी चिखलावडे दरम्यान भोर एसटी आगाराच्या बसवर झाड पडल्याची घटना घडली.

तालुक्यात गेले दोन दिवसांपासून गर्मी वाढली होती. तसेच वातावरण ढगाळही होते. या भागात पाऊस पडला नव्हता. आंबवडे खोऱ्यात शुक्रवारी पाऊस पडला होता. आंबेघर, नांदगाव, कर्नावड आंबवडे परिसरात पाऊस झाला होता. त्यात झाडे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, शनिवारी (ता.११) सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. कुडली बुद्रुक भागातून पावसाने सुरुवात करून तो दुर्गाडी शिरवली, हिर्डोशी, कोंढरी भागातही वळावाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसात शेतकऱ्यांनी भाताच्या पेंध्याच्या रचून ठेवलेला गंजी भिजल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आंबवडे खोऱ्यात आज दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.


नागरिकांना तात्पुरता दिलासा
गेले अनेक दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत असल्यामुळे शहर भागाप्रमाणेच ग्रामिण भागात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गर्मीमुळे नागरिक हैराण झाले होते. पडलेल्या वळिवामुळे थोडासा गारवा निर्माण झाला असल्याने तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


00696

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT