महुडे, ता. २१ : भोर तालुक्यातील हिर्डोशी भागात सोमवारी (ता. २०) संध्याकाळी सहा वाजता वळवाच्या पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडासह वारा व मुसळधार पावसात महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाला. तासाभरात पाऊस थांबला परंतु सोमवारी (ता. २०) रात्रभर व मंगळवारी (ता. २१) दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. जवळपास २४ तासाच्या खंडानंतर मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
हिरडस मावळ भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. त्यात या भागात पाऊस काळात पावसाचा जोर जास्त असून सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे संध्याकाळी लाइट गेल्यावर विशेष करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शासनाने शिधापत्रिकेवरील रॉकेल बंद केल्याने उजेडाचा मोठा प्रश्न या भागातील लोकांना पडला आहे. गोडेतेलाची पणती लावून उजेड करावा लागत आहे. ग्रामीण भागात लाइट नसल्याने पाणी बंद, महिलांना स्वयंपाक करताना, गोठ्यातील जनावरांच्या धारा काढताना अडचण निर्माण होत आहेत. त्यात लाइट अभावी मोबाईलला चार्जिंग देखील नसल्याने या भागातील नागरिक महावितरणाच्या कारभाराला त्रासून गेले आहेत. या भागातील वायरमन सतत कार्यरत आहेत परंतु महावितरण कंपनीने पावसापूर्वीची दुरुस्ती व उपाययोजनेबाबत ठोस भूमिका घेऊन ग्राहकांना कायमस्वरूपी वीजसेवा देण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
‘‘महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता यांना फोनवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. परंतु काल झालेल्या वीज व वादळी वाऱ्यामुळे लाईन नादुरुस्त झाल्याने फॉल्ट शोधण्याचे काम सुरू होते. वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे,’’ असे वायरमन भगवान ठाकूर यांनी सांगितले.
चोवीस तास झाले लाइट नाही. शुक्रवार व शनिवारी पण अशीच दोन दिवस लाइट नव्हती. अशी वारंवार लाइट जात असल्याने भागातील नागरीकांना नाहक त्रास होत आहे. लाइट गेल्यावर रात्रीच्या उजेडाची मोठी समस्या होत असल्याने शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा पाऊस काळासाठी तरी सुरू करावा.
- मारुती धामुनसे, ग्रामस्थ, हिर्डोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.