पुणे

२४ तासांनंतर‌ हिर्डोशी खोऱ्यातील वीज पुरवठा सुरळीत

CD

महुडे, ता. २१ : भोर तालुक्यातील हिर्डोशी भागात सोमवारी (ता. २०) संध्याकाळी सहा वाजता वळवाच्या पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडासह वारा व मुसळधार पावसात महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाला. तासाभरात पाऊस थांबला परंतु सोमवारी (ता. २०) रात्रभर‌ व मंगळवारी (ता. २१) दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. जवळपास २४ तासाच्या खंडानंतर मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
हिरडस मावळ भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. या भागात पाऊस काळात पावसाचा जोर जास्त असून सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे संध्याकाळी लाइट गेल्यावर विशेष करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

‘‘महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता यांना फोनवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. परंतु काल झालेल्या वीज व वादळी वाऱ्यामुळे लाईन नादुरुस्त झाल्याने फॉल्ट शोधण्याचे काम सुरू होते. वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे,’’ असे वायरमन भगवान ठाकूर यांनी सांगितले.

चोवीस तास झाले लाइट नाही. शुक्रवार व शनिवारी पण अशीच दोन दिवस लाइट नव्हती. अशी वारंवार लाइट जात असल्याने भागातील नागरीकांना नाहक त्रास होत आहे. लाइट गेल्यावर रात्रीच्या उजेडाची मोठी समस्या होत असल्याने शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा पाऊस काळासाठी तरी सुरू करावा.
- मारुती धामुनसे, ग्रामस्थ, हिर्डोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT