महुडे, ता.३ : श्री वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्मभूमी असलेल्या शिंद (ता.भोर) येथे गुरुवारी (ता.३) शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. येथे घटस्थापनेपासून श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री वीर बाजीप्रभू प्रतिष्ठान कसबे शिंद आणि गुरुकुल धाम शिंद या संघटनेचे वारकरी धारकरी करत आहेत.
श्री दुर्गामाता दौडची सुरुवात शिंद गावात २०१७ पासून सुरू झाली असून यंदा आठवे वर्ष आहे. श्री वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या मुर्तीचे दर्शन घेऊन प्रेरणामंत्र म्हंटला जातो. त्यानंतर शिंद हद्दीतील शिंद गावठाण, सुभेदारवाडी, नानाची वाडी, सणसवाडी, चव्हाणवाडी येथून फेरी काढली जाते. या फेरीत गावातील शंभरहून अधिक धारकरी सहभागी झालेले असतात. घटस्थापनेपासून प्रारंभ झालेल्या या दौडची दसऱ्याच्या दिवशी सांगता होते. पहाटे देशभक्तीची गीते, पोवाडे म्हणत संपुर्ण गावातून धर्मजागरण करत प्रभातफेरी काढली जाते. देव, देश, धर्मासाठी काम करण्याची इच्छा, आकांक्षा, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा तसेच हिमाचल, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान अखंड राहावा यासाठी तरुणांनी भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात दुर्गामाता, भारतमाता व या देशासाठी,धर्मासाठी जे शूरवीर धारातीर्थी पडले. त्यांचा जयघोष प्रभात फेरीत केला जातो. तसेच या संघटेमार्फत दररोज नित्यनेमाने भोरमधील श्री रायरेश्वर गडाची नित्यपूजा व शिंदमधील श्री वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्तीची पूजा केली जात आहे.
01154
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.