पुणे

कृषिपंपांच्या तारांची वाठार परिसरात चोरी विद्युत मोटारच्या केबलची चोरी

CD

महुडे, ता. ४ : वाठार हि.मा. (ता. भोर) येथील चार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत मोटारीच्या केबलची चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ४) सकाळी समोर आला.
येथील शेतकरी प्रशांत बबन मांढरे, धोंडिबा मनू खाटपे, ज्ञानोबा विठ्ठल खाटपे, दत्तात्रेय कोंडिबा खाटपे यांनी शेतीसाठी पाणी देण्यासाठी वाठार येथे नीरा नदीवर मोटारी बसविल्या आहेत. सचिन आनंदा खाटपे हे भात पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी नदीवर गेले असता त्यांना त्यांच्या शेजारील असणारे वरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीला केबल नसल्याचे दिसले. पाहणी केली असता चार मोटारींना केबल नव्हती. केबल कापून चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना कळवले. घटनास्थळी संबंधित शेतकऱ्यांनी पाहणी केली असता साधारण प्रत्येकी चौघांच्याही मोटारीपासून स्टाटरपर्यंत अंदाजे साडेचारशे ते पाचशे फूट असलेली केबल कापून चोरट्याने चोरून नेल्याचे दिसले. यात हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या पूर्वीही यांच्यातील शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली होती. मात्र, त्यावेळी कोणतीही तक्रार पोलिसात दिली नव्हती. भात पिकाला पाण्याची गरज असताना केबल चोरी झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Criticism Pune Bridge Project : पुण्यातलं आठवं आश्चर्य! या ब्रिजवर चढू शकता पण उतरू शकत नाही, कंत्राट द्यायच्या घाई गडबडीत चूक; जयंत पाटलांचा टोला

T20 WC, NZ vs SA: 'गालावर थोबाडीत मारली असं... ', न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर एडेन मार्करम काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : शेअर मार्केटच्या आमिषाने ज्योतिषाकडून कोट्यवधींची फसवणूक, सायबर पोलिसांची लूक आऊट नोटीस

बापरे! वर्षा उसगांवकरांची लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, नक्की काय घडलं?

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT