महुडे, ता. १९ : शिळींब (ता. भोर) या हिर्डोश खोऱ्यातील दुर्गम डोंगराळ गावातील शेतकरी हनुमंत डेरे यांच्या जर्शी कालवडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १८) दुपारी घडली.
डेरे यांनी आपली जनावरे चारण्यासाठी गावच्या हद्दीतील मळवंडा परिसरात नेली होती. जनावरे चरत असताना काही जनावरे पुढे गेली व मागे राहिलेली जनावरे पुढे घेऊन जात असताना खाली पडलेल्या कालवडीजवळ डेरे यांना बिबट्या दिसला. घाबरलेल्या डेरे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. त्यानंतर गायीजवळ गेले असता गाय जखमी अवस्थेत मृत आढळून आली. त्यानंतर उर्वरित जनावरे घेऊन ते घरी परतले. झालेली घटना वनविभागाला कळवली असल्याचे माजी सरपंच मारुती डेरे व कोतवाल विजय डेरे यांनी सांगितले. गाभण असलेल्या जर्सी कालवडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जनावरांना बिल्ला मारणे अनिवार्य
भोरच्या पश्चिम भागातील काही पशुधनांची इअर टॅगिंगद्वारे कानात टॅग (बिल्ला) मारुन नोंद झाली नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या नविन नियमानुसार जनावरांना बिल्ला मारणे अनिवार्य आहे. बिल्ला नसेल तर भरपाई मिळत नाही. त्यामुळे पशुधन मालकांनी आपल्या जनावरांना बिल्ला मारुन घेणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.