हिर्डोशी, ता. २४ : भोर तालुक्यात गेले दोन दिवस सतत पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील कुडली खुर्द येथील रामचंद्र अर्जुना पोळ यांचा गुरांचा गोठा तर रायरेश्वर येथील संतोष विठ्ठल जंगम यांच्या घराची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटना शनिवारी (ता. २४) सकाळी घडल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचनामा करून प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.
कुडली येथे घरांच्या शेजारीच असणारा कुडा-मेढीचा व कौलारू छप्पर असलेला गोठा वाऱ्यासह पडणाऱ्या पावसात पडला. त्यावेळी गोठ्यात असलेली चार जनावरे किरकोळ जखमी झाली. छतावरील कौले, मेढी, वासे आदींची तुटफुट झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. घटनेची खबर प्रशासनाला कळवली असून ऐन पावसाळ्यात गोठा पडल्याने गुरे बांधण्याची गैरसोय झाली असून नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी सरपंच नामदेव पोळ यांनी कली. तसेच रायरेश्वर येथील घराची दगड मातीची भिंत पहाटे कोसळली. सुदैवाने भिंत बाहेरच्या बाजूला पडल्याने अनर्थ टळला आहे. रविवारी सकाळी पंचनामा करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुहास गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.