हिर्डोशी, ता.२ : टिटेघर (ता.भोर) येथील ट्रॅक्टर वापरत असणाऱ्या १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ट्रॅक्टरसह गावातून मिरवणूक काढण्यात आली. येथील अण्णासाहेब पाटील सभागृहात पंचायत समिती भोर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.१) कृषिदिनानिमित्त कार्यक्रम पार पडला.
ध्रुव प्रतिष्ठानकडून ट्रॅक्टर सजविण्यात आले. तर चालकांना फेटे घालण्यात आले होते. पूजन करून ट्रॅक्टरची निघालेल्या आगळीवेगळ्या मिरवणूकीने एक वेगळेच वातावरण तयार होऊन चालक भावुक झाले होते. मिरवणुकीनंतर आयोजित कृषी दिन कार्यक्रमात चालकांचा मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे झाड देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी शेतकऱ्यांना कृषिदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव, कृषी अधिकारी प्रशांत सरडे, ध्रुवचे अध्यक्ष राजीव केळकर, शेतकरी उज्ज्वला बांदल व रघुवीर केळकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सायबेज आशा संस्थेचे प्रशांत महामुनी, कृषी अधिकारी शिवराज पाटील, सरपंच शशिकला नवघणे, उपसरपंच शंकर सणस, राजेंद्र निगडे, वैजयंता नवघणे, संजीवनी नवघणे, ज्ञानेश्वर भोईटे, ग्रामपंचायत अधिकारी अमोल थोरात यांसह शेतकरी, महिला उपस्थित होत्या. कृषी अधिकारी दीपाली चांदगुडे यांनी सूत्रसंचालन तर कृषी अधिकारी सूरज पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान, ध्रुव प्रतिष्ठानकडून आदिवासी कातकरी समाजातील शेतकऱ्यांचा प्लॅस्टिक ताडपत्री देण्यात आली. सेंद्रिय शेतीत पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आंब्याचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.
02109
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.