पुणे

विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

CD

हिर्डोशी, ता.१८ : नाटंबी (ता.भोर) येथील शेतकरी प्रकाश बाळू खोपडे यांच्या दोन म्हशींचा महावितरणच्या खांबावरून तुटलेल्या विद्युत वाहक तारेतून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१८) सकाळी सव्वासात वाजता घडली. यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाखांचे नुकसान झाले.
शासनाने शेतकरी कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी खोपडे यांचा मुलगा प्रसाद हा सकाळी पाच म्हशी व तीन रेडके अशा आठ जनावरांना चरण्यासाठी रानात घेऊन चालला होता. त्यावेळी मुऱ्हा जातीच्या गाभण असलेल्या दोन म्हशी एकापाठोपाठ एक अशा जमिनीवर अचानक पडल्या. प्रसादने जवळ जाऊन पाहिले असता विजेच्या खांबातून तुटलेल्या तारेचा करंट लागल्याने म्हशी पडल्याचे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून तातडीने इतर जनावरांना तेथून लांब लावले. माहिती कळताच सरपंच विशाल खोपडे, पोलिस पाटील विठ्ठल खोपडे सह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संबंधित अधिकारी यांना कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT