पुणे

विविधरंगी फुले अन्‌ वेलींचा अवतरला रायरेश्वर पठारावर स्वर्ग

CD

हिर्डोशी, ता.९ : किल्ले रायरेश्वर (ता.भोर) येथील पठार लहान लहान नाजूक, विविधरंगी दुर्मीळ फुलांनी, हिरव्यागार वेलींनी तसेच नटलेल्या फुलांच्या गालिच्याने फुलू लागले आहे. हे हिरवा निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी रायरेश्वरचे पठार पर्यटकांना खुणावू लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वरील पठार म्हणजे जणू काही निसर्गसौंदर्याचा ठेवाच म्हणावा लागेल. भोरपासून २८ किलोमीटर अंतरावर हे पठार आहे. ऋतुनुसार या पठारावर निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. बारा किलोमीटर लांब आणि अडीच किलोमीटर रुंद असलेल्या या पठारावरील परिसरात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत निळ्या, पिवळ्या, गुलाबी, पांढऱ्या अशा विविधरंगी दुर्मीळ फुलांचा बहार सुरू होत असतो आणि हा बहार आता सुरू झाला आहे. मुळात तांबड्या मातीमुळे उठून दिसणारे हे पठार आता पिवळ्या, गुलाबी, निळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगांच्या फुलांनी सजू लागले आहे. रंगीबेरंगी फुलांच्या छटा वाऱ्याच्या झोकात आपला शृंगार करीत असतात. त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची पठारावर विविध रंगांचे उधळण होत असल्याचे पर्यटकांना पहावयास मिळत असते. यामध्ये दुर्मीळ फुले मोठ्या प्रमाणावर आहेत. वनदेवतेने अंथरलेला अनोखा गालीचा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांना ही रंगीबेरंगी फुले नेहमीच खुणवतात.

शनिवार, रविवारी पर्यटकांची गर्दी
निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक रायरेश्‍वराला पसंती देतात. निसर्गसौंदर्याचे चित्रिकरण व छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये घेण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. पठारावर वेगवेगळ्या जातीची, वैविध्यपूर्ण फुले फुलली आहेत. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी रायरेश्वरावर नेहमीच फुलांप्रमाणे पर्यटकांची गर्दीही फुललेली असते.


या ठिकाणांचा आनंद
आंबवडे येथील प्राचीन नागेश्वर मंदिर
झुलता पूल आणि धबधबे
रायरेश्वर धबधबा, केंजळगड


02456, 02457, 02458

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT