पुणे

‘राजगड’ देणार इतर कारखान्यांप्रमाणे दर राजगड देणार इतर कारखान्यांप्रमाणे दर

CD

हिर्डोशी, ता. ७ : राजगड साखर कारखाना कार्यक्षेत्रात अधिक प्रमाणात उसाची लागवड व ऊस उत्पादन करून पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरीत्या सुरू करण्यात येणार आहे. नवीन कारखान्याच्या निर्मितीमुळे प्रतिदिन ३५०० टन गाळप क्षमता, पाच टन सीएनजी. गॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामुळे इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादकांना ऊस दर देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयात सोमवारी (ता.६) आयोजित कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्याशी संवाद मेळाव्यात थोपटे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कारखाना ६० के.एल.पी.डी. डिस्टीलरी प्रकल्प, १२ मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ८६,०३२ या जातीचे बेने साडे चार ते पाच फूट पट्टा पद्धतीने देण्यात येणार आहे. ऊस बियाण्यासाठी लागणारी खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच भोर व राजगड तालुक्यातील युवा शेतकरी यांच्यामार्फत ऊस बियाणे नर्सरी निर्मिती करून त्याच्या माध्यमातून ऊस बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येतील.

राज्य सरकारने कारखान्याला दिलेल्या ४६७ कोटी रुपये कर्जहमीबद्दल थोपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्याने सुरू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचा शेतकऱ्यांनी विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, प्रभारी कार्यकारी संचालक आव्हाड, विठ्ठल कुडले, संपतराव थोपटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर चर्चा
शेतरस्ते, वीजसमस्या, सिंचन योजना, ऊसतोडणी यंत्रणा याबद्दल शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक चर्चा झाली. यावर विभाग निहाय अधिकारी नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे.


02649

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL

गौतम गंभीरच्या राज्यात 'पराभव' हा पर्यायच असू शकत नाही, Varun Chakravarthy चे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या शैलीवर मोठं भाष्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?

Bhoom News : रास्ता रोको केल्याने शेतकरी पुत्रावर गुन्हा दाखल; खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त

SCROLL FOR NEXT