पुणे

पोषण आहार कर्मचाऱ्यांची थकीत मानधनाची मागणी

CD

हिर्डोशी, ता. १३ : शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस यांची प्रलंबित असलेल्या मागणीतील एक हजार वाढीव मानधनासह ऑगस्ट, सप्टेंबर या थकीत महिन्यांचे तसेच चालू ऑक्टोबर महिन्याचे मानधन दिवाळीपुर्वी द्यावे अशी मागणी केली आहे. राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिव विठ्ठल करंजे यांनी शनिवारी (ता. ११) झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ही मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीला भोर तालुक्यातील रंजना तावरे, सारिका आहेरराव, उषा कंक, रेखा शिर्के, उज्वला दुरकर, तानाजी तावरे, जोत्स्ना जाधव, विमल शिरवले, सुनीता कोंढाळकर, विमल मळेकर, अलका पिलाणे, कविता मळेकर आदी स्वयंपाकी आणि मदतनीस हजर होत्या.
राज्यात सुमारे १ लाख ६५ हजार तर भोर तालुक्यात ४७८ स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना २५०० रुपये प्रतिमहा मानधन देण्यात येते. आहार शिजविण्याचे काम, तांदूळ आणि धान्यदी मालाची साफसफाई, जेवणाच्या जागेवर आहाराचे वाटप, जेवणाच्या जागा, ताटे आणि स्वयंपाकगृहाची साफसफाई, सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट, पिण्याचे पाणी भरणे आणि जेवताना पाणी पुरवणे, वापरलेल्या भाजीपाल्याची नोंद ठेवणे आदी कामे स्वयंपाकी आणि मदतनीसांना करावी लागत आहेत. या सर्व कामात बराच वेळ लागत असल्यामुळे मिळणारे २५०० रुपये मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे त्यांना २० हजार मानधन मिळावे यांसह शासकीय सेवेत कायम करणे, वेळेवर आणि बारमाही मानधन मिळावे, ओळखपत्रासह वर्षातून दोन गणवेश देणे आदी संघटनेच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT