पुणे

भाटघर धरण क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

CD

महुडे, ता. २३ : भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बुडीत क्षेत्रात पाण्याला लागून किंवा पाण्यात केलेल्या अनधिकृत बांधकामांना जलसंपदा विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. निवंगणी (ता. भोर) येथील धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात केलेले अनधिकृत बांधकाम काढण्यात आले आहे. पुढील सात दिवसात धरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याचे नीरा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.
भंडलकर, भाटघर पाटबंधारे शाखेचे सहाय्यक अभियंता गणेश टेंगले यांच्या मार्फत अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे.
नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अतिक्रमण तातडीने हटवून घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे. अन्यथा अतिक्रमणाबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे भंडलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: कोपरगावात गुलाल आपलाच : रुपाली चाकणकर; पालिका निवडणुकीसाठी आमचे येणे केवळ औपचारिकता

Ranjit Patil: निवडणुकीत अपक्षांची मोट बाधून कऱ्हाडकरांना नवा पर्याय देणार: रणजीत पाटील यांची माहिती: चिन्हावर निवडणुका लढवता येत नसल्याची खंत

''तू माझ्या मुलाचं करिअर बर्बाद केलंय''; 6 SIX नंतर स्टुअर्ट ब्रॉडचे वडील युवराजला काय म्हणाले होते?

Post Gym Hot Shower Risks: वर्कआउटनंतर हॉट शॉवर घेताय? वेळीच थांबा; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

Theur Crime : थेऊर येथे जुन्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; पाच जखमी तर तिघांवर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT