पुणे

साळव येथे बहरली १२ गुंठ्यांत सेंद्रिय हळदीची शेती

CD

हिर्डोशी, ता. ६ : नीरा देवघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराळ साळव (ता.भोर) येथील शेतकरी बाबाजी साळेकर यांनी केशर आंबा बागेमधील १२ गुंठ्यांत सेंद्रिय हळदीची शेती केली आहे.
पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर कृषी शेतीतील उत्पादीत तसेच काळ्या हळदीची सेंद्रिय पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर केलेली लागवड चांगली बहरली आहे. उत्पादन समाधानकारक मिळण्याची आशा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.‌ या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात बियाणे तयार करणार असून या बियाण्यातूनच पुढे व्यापक स्वरूपात शेती करून मिळणाऱ्या उत्पादनातून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

साळेकर यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरपीक म्हणून हळदीची लागवड केली. दोन सरींमधील अंतर ३.५ फूट तर दोन रोपांमधील अंतर नऊ इंच आहे. कंकवाडी दापकेघर (ता.भोर) येथून १०० रुपये किलो दराने १५० किलो बियाणे आणले. कोणतेही रासायनिक खते न वापरता फक्त देशी गायीचे शेण व गोमूत्रा पासून तयार केलेल्या जिवामृतचा वापर करून विषमुक्त शेतीचा प्रयोग केला आहे. यंदा अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाल्यामुळे जमिनीला ओलावा असल्याने पाणी लागले नाही. मात्र,काढणी पर्यंत पुढील काळात दोन पाणी देण्यात येणार आहे.
नागरणी, रोटावेटर, बेड लागवड, तन विरळणी, भर करणे, काढणी, बियाणे इत्यादीसाठी २७ हजार रुपये खर्च आला आहे. घरच्या अवजारांनी व कुटुंबाच्या सहाय्याने मजुरी केल्याने खर्च आटोक्यात आणला आहे. या पिकातून १२०० किलो उत्पादन अपेक्षित आहे.‌ याशिवाय काळ्या हळदीच्या लागवडीसाठी गेल्या वर्षी अकोला येथून ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये याप्रमाणे तीन किलो बियाणे मागवले होते. त्या बियाण्याची लागवड करून मिळालेल्या पिकातून तीस किलो बियाणे तयार झाले. त्या तीस किलो बियाणाची लागवड यावर्षी करण्यात आली आहे. यंदा काळ्या हळदीचे २५० ते ३०० किलो उत्पादन अपेक्षित आहे.

प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या हळदी पिकाची काढणी फेब्रुवारी महिन्यात केली जाणार आहे. यावर्षी मिळालेल्या उत्पादनातून घरगुती वापर आणि बियाणे तयार करण्यात येणार आहे. घरगुती बनवलेल्या बियाणे वापरून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेण्याची तयारी करणार आहे."
- बाबाजी साळेकर, शेतकरी साळव

02837

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT