पुणे

रस्ता रुंदीकरणामुळे मिळणार भोरमधील पर्यटनाला चालना भोरमधील पर्यटनाला रस्ता रुंदीकरणामुळे मिळणार चालना

CD

स्वर्गीय निसर्गाने नटलेला, गड किल्ले, धरणे, घाट रस्ता, ऐतिहासिक वारसा लाभलेला भोर तालुका म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. याच भोरला जोडणाऱ्या मुख्य चारही बाजूंच्या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण होत असल्याने तालुक्याच्या दळणवळणाची समस्या सुटणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिकांचे व्यवसाय, रोजगार वाढणार आहेत.
- विलास मादगुडे, हिर्डोशी


तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी- वाई -सुरूर फाटा या रस्त्यांचे सुमारे ३४० कोटी निधीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट या रस्त्याच्या ७२३ कोटी निधीचे काम जोमात सुरू आहे. दोन्ही रस्ते रुंदीकरणासह सिमेंट काँक्रिटीकरणचे आहेत. देवघर ते हिर्डोशी दरम्यानचे काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच शिंदेवाडी भोर रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे.

वरंधा घाट रस्ता गेल्या सात आठ वर्षांपासून अतिवृष्टीत दरड कोसळणे, रस्ता खचणे, तुटणे तसेच सुरक्षिततेबाबतची खबरदारी घेण्यासाठी आदी कारणांसाठी वरंधाघाट रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद केला जातोय. त्यामुळे पर्यटकांचे वरंधा घाटाकडे येण्याचे प्रमाण कमी झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिक व रोजगारावर झाल्याने स्थानिक तरुणांचे उद्योगधंद्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. परंतु आता नव्याने होणारे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण, संरक्षण भिंती, नवीन मोऱ्या, पूल, संरक्षण कठडे आदींमुळे घाट रस्ता सुरळीत राहण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रस्ता सुस्थितीत व कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याने स्थानिकांचे व्यवसाय व रोजगार वाढणार आहे.

वरंधा घाटातून वाढणार वाहतूक
रस्ते सुस्थितीत होणार असल्याने भोरवरून मांढरदेवला जाणाऱ्या भाविकांची तर पाचगणी, महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. तसेच कोकणातील पर्यटन स्थळे, औद्यागिक वसाहती, माल वाहतूक याबाबतच्या रहदारीबरोबरच चाकरमानी यांची वाहतूक भोरच्या वरंधा घाटातून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भोरमध्ये पर्यटकांची वाढणार वर्दळ
पुणे शहर, सातारा व कोकणातील रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण झाल्याने सहाजिकच भोरमधील पर्यटकांच्या वर्दळीची संख्या वाढणार आहे. यामुळे रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले, भाटघर व नीरा देवघर धरणे, वरंधा व‌ मांढरदेव घाट, आंबवडेचे नागेश्वर मंदिर व झुलता पूल, भोरचा राजवाडा, नीरा नदी घाट, नेकलेस पॉइंट, ऐतिहासिक वाडे, पुरातन मंदिरे अशा पर्यटनस्थळांना चालना मिळून रोजगाराची संधी देखील वाढणार आहे.

कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी मार्ग (भोर हद्दीपर्यंत)
- ३७ किलोमीटर लांबीचा सिमेंटकाँक्रिटचा रस्ता
- कापूरव्होळ ते भोलावडेपर्यंत १० मीटर रुंदी
- भोर शहराजवळ १२ मीटर रुंदी
- भोर ते मांढरदेव दरम्यान ७ मीटर रुंदी
- रस्त्याकडेला १२ बसथांबे
- नेकलेस पॉइंट व मांढरदेवी मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक व बसण्यासाठी बेंच
- वृक्ष लागवड

शिंदेवाडी -भोर -वरंधाघाट मार्ग
- ५७ किलोमीटर लांबीचा सिमेंटकाँक्रिटचा रस्ता
- शिंदेवाडी पासून १० मीटर रुंदीचा रस्ता
- घाट मार्गावरील ७ मीटर रुंदीचा रस्ता
- भोर शहरात १२ मीटरचा रुंदीचा रस्ता
- नवीन पूल व मोऱ्या
- रस्त्याकडेला १२ बसथांबे
- भोर शहरात रस्ता दुभाजक

02947, 02946

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Car Threat Note: ‘मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट’... संजय राऊतांच्या निवासस्थानाजवळील कारच्या काचेवर धमकी, परिसरात खळबळ

IND vs NZ, ODI: विकेटकीपरच्या जागेसाठी तिघांमध्ये शर्यत, केएल राहुलच्या बॅकअपसाठी संधी कोणाला?

Video: ''भाजप कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा लावणार, कुणाचा बाप..'' अमरावतीमध्ये कार्यकर्त्याचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर, मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे फसवणूक - सरनाईकांचा भाजपवर आरोप

Sadanand Date : दहशतवादी कसाबला भिडणारे सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवीन पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT