पुणे

गुढे, निवंगण येथील पुलांचे काम सुरू

CD

हिर्डोशी, ता. ७ : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण रिंग रोडवरील गुढे व निवंगण गावच्या दरम्यान रस्त्यावरील दोन ठिकाणच्या मोऱ्यांची मागील काळात झालेल्या अतिवृष्टीत दुरवस्था झाली होती. या दोन्ही मोऱ्यांच्या ठिकाणी नवीन छोटे पूल बांधण्यात येत असून, त्याचे काम सुरू आहे.
अतिवृष्टी काळात डोंगरावरील दगडधोंडे, राडारोडा वाहून आल्याने मोऱ्यांची दुरवस्था झाली होती. मुसळधार पाऊस झाला की मोरीवरून पाणी वाहत असे. रस्ता पाण्याखाली गेल्यावर पाण्यातून वाहने नेताना धोकादायक परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे दोन्ही मोऱ्या उंचवण्याची गरज होती. भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची दखल घेत मोऱ्यांच्या ठिकाणी छोटे पूल बांधण्यासाठी प्रस्ताव प्रशासन स्तरावर देण्यात आला. त्यातूनच या दोन्ही नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलांसाठी एकूण १ कोटी ५० लाख निधीस मंजुरी मिळाली असून, पुलांचे काम वेगात सुरू आहे. या ठिकाणची पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत होणार असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुलाचे काम होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी रस्त्याने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन बांधकाम विभागाने केले आहे.

सहा मीटर व सात मीटर लांबीच्या अशा दोन्ही पुलांचे काम वेगाने सुरू असून, कामाच्या दर्जाची वेळोवेळी पाहणी केली जाते. पावसापूर्वी दोन्ही पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.
- विशाल गुजर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर

02967

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT