पुणे

भोलावडे- शिंद गटात होणार दमछाक

CD

विलास मादगुडे : सकाळ वृत्तसेवा
हिर्डोशी, ता. १६ : भोर तालुक्यात असलेल्या चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. यातील भोलावडे व शिंद या दोन गणांचा मिळून तयार झालेल्या भोलावडे- शिंद या जिल्हा परिषद गटात भोरच्या पश्चिम दुर्गम डोंगरी भागातील ७६ गावांचा समावेश आहे. भाटघर व नीरा देवघर धरणांच्या दोन्ही बाजूंची गावे असल्याने तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठा व प्रवासासाठी किचकट व वेळ घालवणारा गट आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेळ कमी असल्याने मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (ता. १६) सुरुवात झाली असून, २१ जानेवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. तर, छाननी व चिन्ह वाटप २७ जानेवारीला होणार असून, मतदान ५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे चिन्ह मिळल्यानंतर फक्त सात ते आठ दिवस प्रचारास मिळणार आहेत. त्यामुळे भोलावडे- शिंद गट व गणात उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.
भोलावडे गणात ३६ गावे येत असून, भोर कापुरव्होळ मार्गावरील सांगवी येवली व भोलावडे, महुडे मार्गावरील किवत तर भाटघर धरण दोन्ही बाजूंच्या किनाऱ्यालगतच्या गावांचा समावेश आहे. यात बसरापूरपासून साळुंगणपर्यंत, तर वाढाणेपासून भुतोंडे खोऱ्यातील गावांचा समावेश आहे. तर, शिंद गणात ४० गावांचा समावेश असून, यात महुडे खोऱ्यातील गावे, भोर- महाड मार्गालगतची पिसावरेपासून वरची गावे, म्हसर खोरे तसेच हिर्डोशी खोऱ्यातील नीरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजूंच्या गावांसह वरंध घाटातील व शिळिंब ग्रामपंचायतीच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवारांसह पंचायत समिती उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

भोलावडे- शिंद गट
एकूण गावे- ७६
मतदान- पुरुष १८,४९६, स्त्री १७,०५१, एकूण ३५,५४७
भोलावडे गण
गावे- ३६
मतदान- पुरुष ८८९५, स्त्री ८३६२, एकूण १७,२५७
शिंद गण
गावे- ४०
मतदान- पुरुष ९६०१, स्त्री ८६८९, एकूण १८२९०

भोलावडे गणातील गावे
वाढाणे, करंदी बुद्रुक, करंदी खुर्द, कांबरे बुद्रुक, कांबरे खुर्द, कुरुंजी, मळे, गुहिणी, खुलशी, कुंबळे, बोपे, चांदवणे, भुतोंडे, डेरे, भांड्रवली,साळुंगण, सांगवी वेखो, डेहेण, कोंडगाव, पांगारी, नानावळे, जयतपाड,नांदघुर, वेळवंड, राजघर, पसुरे, तळजाईनगर, म्हाळवडी, कर्णवडी, बारे बुद्रुक, बारे खुर्द, किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.

शिंद गणातील गावे
गवडी, शिंद, नांद, महुडे खुर्द, ब्राह्मणघर हिमा, महुडे बुद्रुक, भानुसदरा, पिसावरे, वाठार हिमा, नांदगाव, आपटी, करंजगाव, निगुडघर, देवघर, म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, कोंढरी, वेणुपुरी, हिर्डोशी, धामुनशी, वारवंड, कारुंगण, कुंड, राजिवडी, शिळींब, आशिंपी, उंबर्डे, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी,कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, शिरवली हिमा, गुढे, निवंगण, पऱ्हर खुर्द, माझेरी, पऱ्हर बुद्रुक, धानवली, दापकेघर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT