पुणे

राजगडमध्ये बंडखोरांमुळे चुरस

CD

वेल्हे, ता. २२ : राजगड तालुक्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सरळ लढत होईल, असे वाटत असताना राष्ट्रवादीमधील काहींचे पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर बंडखोर उमेदवार स्थानिक पातळीवर इतर पक्षांनी आघाडी करत असल्याचे चित्र सद्यस्थितीला दिसत आहेत. पक्षांचे एबी फॉर्म न मिळाल्याने अनेक उमेदवारांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. कोणत्या पक्षाला बंडखोरी रोखण्यात यश येईल, हे पाहावे लागणार आहे.
राजगड तालुक्यामध्ये वेल्हे बुद्रुक गटासाठी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या रामचंद्र भगवान जानकर यांनी जातपडताळणीसाठीची पोहोच दाखल न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला असून, जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी ४७ जणांचे वैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
राजगड तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले होते. या निवडणुकीमध्येसुद्धा राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या जास्त होती. नाराजांची संख्यासुद्धा याच पक्षात अधिक आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असल्या तरीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म न मिळाल्याने ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठांची उमेदवारी भाजपकडून नाकारण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसमधूनच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तरुणांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना मूळच्या भाजपमधील एकाही उमेदवाराला तिकीट न दिल्याने भाजपमध्येसुद्धा अंतर्गत कलह निर्माण झाला आहे.
स्थानिक पातळीवरती बंडखोर उमेदवार, तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना शिंदे यांची छुपी युती होणार असल्याचे चर्चा आहे. तालुक्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर मनसेकडून दोन ठिकाणी, वंचित बहुजन आघाडीतून दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT